पोस्ट्स

आपल्या देवाविषयीच्या संकल्पना विस्तारणारे गाणे,

इमेज
दोनच दिवसांपूर्वीची गोष्ट आहे . व्हाट्सएपच्या एका ग्रुपवर मराठीत नुकत्याच प्रदर्शित झालेल्या देऊळबंद २ या चित्रपटावर चर्चा सुरु होती.चर्च करता करता गाडी याच चित्रपटाच्या नावाशी सारखेपणा असलेल्या देऊळ या चित्रापाशी येऊन थांबली .चर्चा भुरकट आहे हे लक्षात अळ्यांचे ऍडमिनने चर्चा लगेच थांबवली .मात्र त्यावेळी माझ्या मनात सुरु असलेले विचार चक्र अजून सुरूच आहे .तसे बघायला गेले तर हा विषय आपणास काही नवीन नाही हिंदीतील गोष्टच सोडा आपल्या मराठीत देखील हा विषय कल्पकतेने मांडण्यात आला आहे . आपल्या मराठीच्या उत्तमोत्तम  गाण्याच्या खजिन्यातील एक असलेले 'देव  देव्हाऱ्यात नाही देव नाहोती देवालयी'  हे झाला महार पंढरीनाथ या चित्रपटातील गाणे हे याचे एक उत्कृष्ट उदाहरणच म्हणता येईल  ‘देव देव्हाऱ्यात नाही, देव नाही देवालयी’ हे मराठी गाणे आपल्यास काय सांगते ? याचा एका ओळीचा सारांश  सांगायचं झाल्यास,  देव ही केवळ मूर्ती, मंदिर किंवा देव्हाऱ्यात मर्यादित असलेली संकल्पना नाही. उलट, देव हा प्रत्येक सजीवात, प्रत्येक चांगल्या कृतीत आणि माणसाच्या अंतःकरणात वास करतो. आपण अनेकदा देवा...

मोबाईलला केले जात आहे बळीचा बकरा ..

इमेज
मोबाईलला केले जात आहे बळीचा बकरा .. शीर्षक वाचून गडबडलात का ? आता हा काय सांगतोय मोबाईलला कोणी केले बळीचा बकरा .. मुळात मोबाईल हे एक यंत्र आहे तो काही सजीव प्राणी नाही त्यामुळे त्याला मुळातच बळीचा बकरा कसे केले जाऊ शकते असे एक ना अनेक प्रश्न तुमच्या मनात आले असतील तर जरा थांबा आणि मी काय म्हणतोय (म्हणजे लिहितोय हो...! ) हे जरा समजून घ्या  तर वाचक मित्र मैत्रिणींनो आजची पिढी काही वाचतच नाही जेव्हा बघावे तेव्हा त्यांच्या हातात मोबाईल आणि मोबाईल असे आपण अनेकदा ऐकतो वाचतो.  आजच्या पिढीच्या वाचायला न आवडण्याचे पाप सरळ मोबाईलवर ढकलून दिले जाते जसे काही मोबाइलमुळेच वाचन संपले म्हूणनच  म्हंटले मोबाईलला केले जात आहे बळीचा बकरा  मला मान्य आहे की, मोबाईलमुळे वाचन काहीसे कमीच झाले आहे.मात्र वाचन कमी होण्यामागचे तेच एक कारण नाहीये. आपण जर इतिहासात बघितले तर  कारणे काहीही असो  वाचन मुळातच कमीच होते, असे दिसते.  किंबहुना त्यामुळेच समर्थ रामदास स्वामींना,  ... प्रसंगी अखंडित वंचित जावे असा उपदेश करावा लागला. जरा विचार करा जर रामदास स्वामींच्या काळात वाचन मोठ्या प...

मानवी आयुष्यातील नात्यांचे महत्त्व उलगडणारा चित्रपट '“अमृत

इमेज
              आज २०२६ साली सुद्धा गावाच्या साधारणतः मध्यभागी असलेल्या महादेवाच्या मंदिराला केंद्र मानून एक दीड  किलोमीटरचे वर्तुळ काढले तर संपूर्ण गाव येऊ शकेल अश्या धार्मिक महत्त्व असलेल्या त्रंबकेश्वर या शहरातील एका ब्राह्मण कुटूंबियातील धोंडोपंत फाळके (दादासाहेब फाळके ) यांनी ११३ वर्षांपूर्वी भारतात आणलेले चित्रपट हे तंत्र मोठे विलक्षण आहे. मानवी आयुष्यतील रंजकता, दाहकता यांचे प्रभावीपणे सादर करणे. समाजाला उपयोगी पडेल असा संदेश समोरच्याला आपणास उपदेश केला आहे याची थेट जाणीव न होता समजेल अश्या पद्धतीने देण्यासह व्यक्तीचे मनोरंजन करण्यात चित्रपटाचा हात कोणी धरू शकणार नाही, असे मला वाटतंय.   संगीत नाटक, एकपात्री नाटक,  दोन अंकी नाटक, फिरता रंगमंच असलेले नाटक तमासातील वगनाट्य आणि यासारखे कोणतेही प्रकार घेतले तरी त्यास चित्रपटाची सर येणे निव्वळ  अशक्यच .  आपल्या भारताला अनेक उत्तोमत्तम आशयघन चित्रपटाची मोठी परंपरा आहे . याच अभिंनदनास्पद वाटचालीतील अनेक महत्त्वाचा चित्रपट म्हणजे अमृत   “अमृत हा १९८६ साली प्रदर्शित झ...

पती-पत्नीच्या विश्वासाची दृढता स्पष्टपणे दाखवून देणारे गाणे

इमेज
दोनच दिवसापुर्वीची गोष्ट आहे. एका वर्तमानपत्रात सध्या समाजात वाढणारे घटस्फोट, आणि त्यातून निर्माण होणारे एकल पालकत्व यावर परखड भाष्य करणारा लेख वाचायला मिळाला.पती-पत्नींचा संघर्षात त्याच्या अपत्यांचे होणाऱ्या मानसिक शोषणाबाबत लेख चिंता व्यक्त केली होती. मी फावल्या वेळात अनेकदा गाणी ऐकतो. त्यामुळे अनेकदा होत काय ? तर एखादी घटना बघितली एखादा लेख वाचला की, आपोआप अरे या प्रसंगाला हे गाणे याला शोभून दिसेल,असे लक्षात येते.याही वेळी अग्गदी तसेच झाले.या लेखाला मला एक गाणे आठवले ते म्हणजे, 'दिस येतील,दिस जातील भोग सरेल, सुख येईल',हे गाणे.१९८२ प्रदर्शित झालेल्या शापीत या चित्रपटातील हे गीत स्मिता पाटील आणि कुलदिप पवार यांच्यावर चित्रीत झाले आहे. या गीताचे गायक आशा भोसले आणि सुरेश वाडकर आहे गीतकार सुधीर मोघे असून संगीतकार    सुधीर फडके आहेत कातकरी समाजाच्या कष्टकरी जिवनाच्या पार्श्वभुमीवर हे गाणे चित्रीत झालेले असले तरी, माझ्यामते हे गाणे कोणत्याही नवरा -बायकोच्या नात्यावर भाष्य करणारे गाणे म्हणून ओळखले जाऊ शकते. ज्यात पत्नी आपल्या पतीस सध्या जरी कष्ट्राचे दिवस असले तरी आपण ए...

समाजसेवा करु इच्छिणाऱ्या व्यक्तीने बघावाच असा चित्रपट ट्रॅफिक सिग्नल'

इमेज
 तरुण भारत,नागपूरच्या पुणे आवृत्तीत सध्या दर रविवारी एक सदर प्रसिद्ध होत आहे, पोरकं पोरे नावाच. विविध कारणांनी बालपणीच्या आनंदाला मुकलेली, बालपणा देगा देवा मुंगी साखरेचा मेवा, या वाक्यप्रचारात सांगितल्याप्रमाणे बालपणीचा मनमुराद आनंद न घेता, करपलेल्या अभागी आयूष्याला सामोरे जाणाऱ्या मुला- मुलींची माहिती या सदरात देण्यात येते‌.याच मालिकेत एक लेख होता, ट्रॅफिक सिग्नलवर आयुष्य व्यतित करणाऱ्या मुला-मुलींच्या आयुष्यातील मन पिळटावून सोडणाऱ्या आयुष्यावर.तसे हा विषय अनेक प्रकार चित्रपटातून दाखवण्यात आला आहे‌. स्लमडॉग मिलेनीयम या चित्रपटातील  मधील बराच मोठा भाग यांच्या आयुष्यावर भाष्य करतो. असो. मी एस.पी .कॉलेजमध्ये शिकत असताना मोठ्या प्रमाणात चित्रपट बघितले त्या अनुभवानुसार सांगतोय,ही समस्या जर कोणत्या चित्रपटात अत्यंत प्रभावीपणे मांडली असेल तर ती मधुर भांडारकर  दिग्दर्शित आणि निर्मित ' ट्रॅफिक सिग्नल या चित्रपटात. तसे  मधूर भांडारकर यांचे सर्वच चित्रपट जेल, पेज थ्री, कार्पोरेट, मै माधूरी दिक्षीत बनना चाहतू हूं,  सामाजिक समस्यांना कलात्मकतेने रूपेरी पडद्यावर दाखवता येऊ श...

समस्या सारखीच, फक्त माध्यमात फरक

इमेज
कालच मला व्हाट्सअप वर एक व्हिडिओ दिसला. व्हिडिओमध्ये आजची तरुण पिढी  झेन झी ही इंटरनेटच्या आहारी गेल्यामुळे कसे देशाचे वाटोळे होत आहे, यावर साधरणत:सत्तरीच्या वयाचे आजोबा चिंता करत होते. तो व्हिडीओ बघत असताना, मला का जाणे कुणास ठाउक, माझ्या नाशिकच्या कवीवर्य कुसुमाग्रजांच्या कवितेतील ओळी आठवायला लागल्या. 'तरुणाईचे बळ देशाचे जपा वाढवा तरुपरी । करमणुकीच्या गटारगंगा त्यात तयाला क्षाळु नका ॥' कुसुमाग्रजांच्या सुप्रसिद्ध 'स्वातंत्र्य देवतीची विनवणी' या कवितेतील या ओळी व्हिडीओशी देखील मेळ खात होत्या. आजोबा तरुणाईच्या व्यसनाविषयी बोलत होते, आणि कवीवर्य कुसुमाग्रज देखील आजपासून २९ वर्षापुर्वी याच तरुणाईला वेळ वाया घालण्यापासूं परावृत्त करण्याच्या प्रयत्न करत होते.तशी ती संपूर्ण कविताच विचार करण्यासारखी आहे.गेल्या ३०वर्षात परिस्थिती किती सुधारली (किंबहुना बिघडली)याचा विचार करणारा स्वतंत्र लेखाचा विषय होईल.मात्र तूर्तास आपण तो विषय बाजुला ठेवूया.असो तर कविवर्य कुसुमाग्रजांनी त्या वेळच्या निरर्थक गोष्ट्रीत तरुणाईने वेळ वाया घालवू नये.तरुणाईने करमणूकीला कमी महत्त्व देत द...

मनोव्यथा राजहंसाची

इमेज
 काही दिवसापूर्वी मराठीतील एक सुप्रसिद्ध साहित्यकार गजानन दिंगबर माडगूळकर अर्थात ग . दि .मा यांच्या पुणे शहरातील बंगल्याविषयीच्या उलट सुलट बातम्या सोशल मीडिया आणि न्यूजपेपरमध्ये ‘आपण वाचल्या असतीलच. मला त्या वादात पडायचे नाही.  गीत रामायण सारखी अवीट भक्तीने भरलेली रचना करणाऱ्या या साहित्यिकाच्या  गीत रामायण सोडून अनेक साहित्यकृती देखील  या अक्षरशः जीव ओवाळून टाकण्यासारख्याच आहे यातलीच एक प्रसिद्ध कविता म्हणजे, ' एका तळ्यात होती,बदके पिल्ले सुरेख,होते कुरूप वेडे पिल्लू तयात एक' इतरांच्या पेक्षा वेगळी प्रतिभा असलेल्या व्यक्तींच्या प्रतिभेची समाजाकडून यथोचित दाखल घेतली न गेल्याने त्यांना काय त्रास सोसावा लागतोय हे एका बदक आणि राजहंसचे प्रतीक वापरत अत्यंत सोप्या भाषेत यातगदिमांनी मांडलंय . आपण जर समाजाकडे उघड्या डोळस नजरेने बघितले तर अशी प्रतिभेची योग्य प्रकारे दाखल न घेतलेली अनेक राजहंस  दिसतात. आपल्यापेक्षा कमी प्रतिभा असलेली माणसे आपल्या पुढे जात आहेत हे बघताना त्यांच्या मनाची काय अवस्था होत असेल हे आपण त्या गाण्यातून समजावून घेऊ शकतो .       ...