पोस्ट्स

जानेवारी, २०२६ पासूनच्या पोेस्ट दाखवत आहे

कर्तृत्व सिद्ध करायला सांगणारे गाणे, 'आकाशी झेप घेरे पाखरा'

इमेज
  दोन दिवसापूर्वीची गोष्ट आहे वेळ साधारणत: रात्रीच्या नऊच्या आसपसाची. पुणे शहरातील मंडई या भागातून दत्तवाडीतून जाण्यासाठी बस मध्ये प्रवास करत होतो. बस मध्ये एक सत्तर वर्षाचे आजोबा सुद्धा प्रवास करत होते माझ्याबरोबर. आजोबांनी त्यांच्या मोबाईलवर गाणी लावली होती  अर्थात आजोबांचे वय बघता त्यांनी हेडफोन न लावता स्पीकरवर  फोन ठेवत गाणे सुरू केले होते त्यामुळे ते गाणे मला पण ऐकू आले गाण्याचे बोल होते 'आकाशी झेप घे रे पाखरा सोडी सोन्याच्या पिंजरा' . माझा प्रवास दहा मिनीटात संपला. मात्र  अत्यंत व्यापक अर्थ आणि सुंदर गेयता असलेल्या  या गाण्यामुळे सुरु झालेली माझी विचार प्रक्रिया अजून सुरूच आहे.  १९७६ साली आलेल्या 'आराम हराम है', या मराठी चित्रपटातील हे गाणे. चित्रपटाचे नाव जरी हिंदी वाटत असले तरी चित्रपट मराठी आहे तो देखील १९७६ साली ही गोष्ट विशेष आहे. सुमारे दोन वर्षापुर्वी मराठी चित्रपटांची नावे विनाकारण इंग्रजीत ठेवली जातात,असी टिका केली जात होती.त्या पार्श्वभुमीवर आजपासून ५० वर्षापूर्वी हिंदीशी साध्यर्म साधणारे नाव मराठी चित्रपटाला देणे एक वेगळेच...

संवादाची नवी परीभाषा उलगडणारा चित्रपट 'पुष्पक'

इमेज
  मनुष्य हा समाजप्रिय प्राणी आहे.मनुष्याला दुसऱ्या व्यक्तीशी संवाद साधायला आवडते. संवाद साधायला मनुष्य त्याला निसर्गाकडून मिळालेल्या अनोख्या अस्या स्वरयंत्रातून विविध आवाज काढतो. या आवाजातून भाषा तयार होते आणि मनुष्य या भाषेच्याद्वारे संवाद साधतो,असे समाजशास्त्रज्ञ नेहमी सांगतात. मात्र भाषाद्वारेच संवाद साधता येतो का, की भाषेशिवाय देखील अन्य संवादाची माध्यमे आहेत याचा अभ्यास करता समोर येणारे चित्र मोठे मनोरंजक आहे‌, आणि या मनोरंजक विश्वाची ओळख होते,ती बॉलिवूडमधील एक उत्तम अभिनेते असलेल्या कमल हसन यांनी १९८७ साली भुमिका केलेल्या 'पुष्पक' या चित्रपटामुळे. या चित्रपटाचे दिग्दर्शक होते सिंगीतम् श्रीनिवास राव, तर सिंगीतम् श्रीनिवास राव आणि श्रृंगार नागराज या दोघांनी मिळून त्याची निर्मिती केली होती. कमल हसन यांनी हिरोची तर हिरोईनच्या भुमिकेछ अमला अक्किनेनी होत्या. अन्य प्रमुख कलाकारांचा विचार करता रमेश, फरीदा जलाल, प्रताप पोतन, लोकनाथ, पी. एल. नारायण, रम्या  आदींनी यात भुमिका केल्या होत्या   बंगळूरूमध्ये चित्रीत झालेल्या या चित्रपटात एक देखील स...