संवादाची नवी परीभाषा उलगडणारा चित्रपट 'पुष्पक'

  मनुष्य हा समाजप्रिय प्राणी आहे.मनुष्याला दुसऱ्या व्यक्तीशी संवाद साधायला आवडते. संवाद साधायला मनुष्य त्याला निसर्गाकडून मिळालेल्या अनोख्या अस्या स्वरयंत्रातून विविध आवाज काढतो. या आवाजातून भाषा तयार होते आणि मनुष्य या भाषेच्याद्वारे संवाद साधतो,असे समाजशास्त्रज्ञ नेहमी सांगतात. मात्र भाषाद्वारेच संवाद साधता येतो का, की भाषेशिवाय देखील अन्य संवादाची माध्यमे आहेत याचा अभ्यास करता समोर येणारे चित्र मोठे मनोरंजक आहे‌, आणि या मनोरंजक विश्वाची ओळख होते,ती बॉलिवूडमधील एक उत्तम अभिनेते असलेल्या कमल हसन यांनी १९८७ साली भुमिका केलेल्या 'पुष्पक' या चित्रपटामुळे. या चित्रपटाचे दिग्दर्शक होते
सिंगीतम् श्रीनिवास राव, तर सिंगीतम् श्रीनिवास राव आणि श्रृंगार नागराज या दोघांनी मिळून त्याची निर्मिती केली होती. कमल हसन यांनी हिरोची तर हिरोईनच्या भुमिकेछ अमला अक्किनेनी होत्या. अन्य प्रमुख कलाकारांचा विचार करता रमेश, फरीदा जलाल, प्रताप पोतन, लोकनाथ, पी. एल. नारायण, रम्या  आदींनी यात भुमिका केल्या होत्या
  बंगळूरूमध्ये चित्रीत झालेल्या या चित्रपटात एक देखील संवाद नाहीये‌. चित्रपटातील पात्रे एकमेकांशी संवाद साधतात, ती डोळे, नाक, चेहरा यांच्यातील हावभावाने. मात्र त्या वेळच्या सरकारी नियमांनुसार चित्रपटाची एक भाषा असावीच लागते, त्यामुळे चित्रपटाच्या सुरवातीला जे प्रमाणपत्र येते,त्यात हा चित्रपट कन्नड भाषेत असल्याचे सांगितले आहे‌.
    संवाद साधायला मौखिक साधनांची गरज नसते, देहबोलीतून देखील संदेश देता येतो हा संदेश या दोन तासाच्या चित्रपटातून देण्यात येतो.चित्रपट युट्युबवर उपलब्ध आहे.
     रोजच्या आयुष्यात जगताना लोभ आणि नैतिकता यात या मानवी मुल्यांमध्ये अनेकदा संघर्ष निर्माण होतो. आपणास एखाद्या गोष्टीचा लोभ होतो,  मात्र तो लोभ नैतिकतेचा विचार करतो, पुर्णत: चूकीचा असतो. त्यावेळी आपला हे करु ते करू असा गोंधळ उडतो. हा उडणारा गोंधळ हे या चित्रपटातील मुख्य कथासुत्र आहे.आता या संघर्षात कोण जिंकतो ,आणि कोणत्या पद्धतीने जिंकतो हे बघायला हा चित्रपट बघायला हवा.
    चित्रपटाची कथा एका बेरोजगार तरुणाभोवती फिरते. हा तरुण एका छोट्याशा घरात राहतो, रोज नोकरीच्या शोधात भटकतो; परंतु सतत अपयशच पदरी पडते. गरिबी, उपासमार आणि असहाय्यता यामुळे त्याचे आयुष्य निराशेने भरलेले असते.एका दिवशी त्याला योगायोगाने एक मद्यधुंद श्रीमंत व्यक्ती रस्त्यावर बेशुद्ध अवस्थेत सापडते. त्या व्यक्तीकडे आलिशान घराची किल्ली आणि महागडी कार असते. क्षणिक मोहापोटी हा तरुण त्या किल्ल्यांचा वापर करून श्रीमंताच्या घरात राहायला जातो. तेथे त्याला ऐश्वर्य, आराम आणि सुखसोयींचा अनुभव मिळतो. काही काळ तो हे जीवन मनमुरादपणे जगतो.याच दरम्यान त्याची ओळख एका तरुणीशी होते. तिच्याशी निर्माण झालेले प्रेम त्याच्या आयुष्याला नवा अर्थ देते. मात्र, हळूहळू त्याला जाणवते की हे सुख खोट्या आधारावर उभे आहे. ज्या श्रीमंताचे घर त्याने बळकावले आहे, त्याच्यावर एका खुनी माणसाने नजर ठेवलेली असते. परिस्थिती गंभीर होत जाते आणि जीवावर बेतण्याची शक्यता निर्माण होते.अखेरीस हा तरुण नैतिकतेचा मार्ग स्वीकारतो. खोट्या आयुष्यापेक्षा स्वाभिमान महत्त्वाचा आहे, हे त्याला उमगते. तो सर्व ऐश्वर्याचा त्याग करून पुन्हा आपल्या साध्या, प्रामाणिक जीवनाकडे वळतो.
लेखाच्या सुरवातीला सांगितले, त्याप्रमाणे संवादाची नवी परिभाषा आपणास या चित्रपटामुळे समजते.मुके बहिरे, यांच्या त्रासाची आपणास सखोलतेने जाणीव होते. ज्यांना एकमेकांची भाषा समजत नाही, अस्या व्यक्ती कोणत्या पद्धतीने संवाद साधू शकतात.हे देखील या चित्रपटातून समजते,तर बघणार ना हा चित्रपट.


टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

पुरुषांसाठी महिला किती आवश्यक आहे, हे स्पष्ट करणारे गाणे, 'इसलिये लडकिया, लडकोंसे...

मानवी आयुष्यातील छंदाचे महत्त्व स्पष्ट करणारा चित्रपट,' जब वी मेट'

जाने क्यू .....