पोस्ट्स

जून, २०२२ पासूनच्या पोेस्ट दाखवत आहे

मनाच्या माध्यमातून व्यक्तीमत्तवाचा ठाव घेणारी कार्यशाळा ...युवा स्पंदन

इमेज
  आपल्या सभोवताली व्यक्तीच्या बाह्यरुपावरुन व्यक्तीमत्वाचा ठाव अनेकदा घेतला जातो . यामुळे बाह्य कपडे   कसे असावेत ? चेहऱ्यावर खोटे खोटे का   असेना हास्य कसे ठेवावे ? याबाबत अनेक कार्यशाळा सातत्याने होत असल्याचे आपण पहातो . मात्र आपल्या शाररीक हालचालीवर , देहबोलीवर प्रचंड नियंत्रण असणारा आणि   सहजतेने न दिसणारा घटक म्हणजे मन . आपल्या इतिहासातील अनेक महान व्यक्तींचा जीवनक्रम अभ्यासल्यास त्यांनी मनाचा चांगला अभ्यास केल्याचे दिसून येते . मात्र सध्या मन हा विषय काहीसा दुर्लक्षीला गेला आहे . आपल्या व्यक्तीमत्वावर प्रचंड परीणाम करणाऱ्या या घटकावर काही मोजक्या संस्थाच काम करतात . अस्या मोजक्या संस्थांमध्ये नाशिकमध्ये कार्यरत असलेल्या अमोल कुलकर्णी यांच्या मनोवेध फाउंडेशचा उल्लेख करावाच लागेल . या संस्थेमार्फत लोकांना शिबिराच्या माध्यमातून वारंवार मनोव्यापाराचा आपल्या व्यक्तीमत्वावर काय परीणाम होतात ?   चांगल्या व्यक्तीमत्व असणाऱ्या व्यक्तीची मनोवस्था काय असते ? सकारात्मक...

एका कप्यात बंद करण्यात आलेले साहित्यिक पु.ल.

इमेज
  जून महिन्याचे समान १० / १० दिवसाचे तीन भाग केले   तर जो दुसरा भाग होईल त्याचे पहिले   तीन दिवस अर्थात ११ जून , १२ जून आणि १३   जून मराठी साहित्यावर प्रेम करणाऱ्या सर्वांसाठी अत्यंत महत्त्वाचे . ११ जून ही मोठ्या प्रमाणात   बालसाहित्य   तयार करणारे साहित्यिक साने गुरुजी   यांची पुण्यतिथी , १२ जून म्हणजे मराठीतील श्रेष्ठ साहित्यिक पुरषोत्तम लक्ष्मण देशपांडे अर्थात पु . ल . देशपांडे यांची पुण्यतिथी तर १३ जून ही श्रेष्ठ साहित्यिक आचार्य अत्रे यांची पुण्यतिथी . या तिन्ही साहित्यिकांची लेखनाची काही गुणवैशिष्टये होती साने गुरुजींच्या विषयी मी कालच लिहले होते आज मी बोलणार आहे पु . ल देशपांडे यांच्याविषयी .         सर्वप्रथम त्यांच्या पुण्यतिथीनिमित्त त्यांना भावपूर्ण आदरांजली पु . ल . म्हंटले की प्रामुख्याने विनोदी लेखन करणारे साहित्यीक म्हणूनच ओळखले जातात . मात्र त्यांनी फक्त मराठीमध्ये विनोदी साहित्य निर्मितीच केली ...

हळव्या मनाचा बाल साहित्य निर्मितीकार ... साने गुरुजी*

इमेज
  आजकाल लहान मुले फारसी वाचत नसल्याची तक्रार सातत्याने करण्यात येते . या विषयावर चर्चा करताना काही जण आता मुलांना   वाचायला बालसाहित्य कुठे आहे ? असा प्रश्न उपस्थित करताना दिसतात . या पार्श्वभूमीवर विपूल प्रमाणात बालसाहित्य निर्माण करणाऱ्या साने गुरुजींची आठवण आल्याशिवाय रहात नाही . आज 11 जानेवारी 2021 रोजी त्यांची 71 वी पुण्यतिथी त्या निमित्ताने त्यांना भावपुर्ण आदरांजली .    साने गुरुजींचे श्मामची आई हे पुस्तक खुपच प्रसिद्ध असले तरी त्यांचे फारसे प्रसिद्ध नसणारे बालसाहित्य प्रचंड आहे . बालमनावर उत्तम संस्कार करत असतानाच त्यांचे मनोरंजन करण्याचे दुहेरी कार्य त्यांचा लेखनातून   उतरलेले सहजतेने दिसते . अनेकदा संस्काराचा नावाखाली मुलांना नकोसे वाटेल असे बोजड साहित्य मुलांचा माथी मारले जाते . किंवा मनोरंजनाखाली   काहीही संस्कार   करत नसलेले साहित्य त्यांचा माथी मारले जाते . दुसऱ्या प्रकारचे उत्तम उदाहरण म्हणजे पुस्तक स्वरुपात प्रसिद्ध झालेली कार्टून्स...