जाने क्यू .....
कालचीच गोष्ट आहे . सहज विरंगुळा म्हणून युट्युब वर सर्फिंग करत असताना एक गाणे समोर आले . प्रीती झिंटा आणि अमीर खान यांच्यावर चित्रीत झालेले . बाँलीवूडच्या आतापर्यतचा इतिहासातील सर्वोत्तम गाण्यापैकी एक असणारे हे गाणे प्रेम का करतात ? या अतिगहन प्रश्नाचे उत्तर शोधणारे . गाण्याचा सुरवातीला नायक प्रेमामध्ये काय काय तडजोडी कराव्या लागतात ? प्रेमामुळे कोणकोणत्या समस्यांना सामोरे जावे लागते ? याचा पाढा नायीकेसमोर वाचतो . नायक प्रेमाच्या अडचणी सांगत असताना नायिका तिच्या कामात व्यस्त असते . नायकाकडे सातत्याने दुर्लक्ष करते . सरतेशेवटी नायकाच्या प्रश्नाला सविस्तर उत्तर देते , आणि गाणे संपते . एक छोटीसी संकल्पना कस्या पद्धतीने खुलवता येते याचे उत्कट उदाहरण म्हणजे हे गाणे , दिल चाहता है या . चित्रपटातील आहे . मुळच्या चित्रपटाविषयी काहींच्या नकारात्मक भावना , अभिप्राय असू शकतील , मात्र या गाण्याविषयी नकारात्मक भावना ठेवणारा खचितच एखाद दुसरा असेल ...