पोस्ट्स

एप्रिल, २०२५ पासूनच्या पोेस्ट दाखवत आहे

एक नजर त्यांचा कामावर

इमेज
मी काही महिन्यापुर्वी छावा हा चित्रपट  बघितला. चित्रपटातून आपणास अनेक अज्ञात बाबी समजतात.त्याबद्दल चित्रपट निर्मात्या रवी कौशीकचे मानावे तितके आभार कमीच आहे. त्याच्यामुळे मराठ्यांचा ज्वाजल इतिहास समस्त देशवासीयांच्या समोर आला.या चित्रपटाविषयी अनेकांनी भरभरुन लिहल्याने त्याविषयी मी काही जास्त बोलणार नाही.तितकी माझी पात्रता देखील नाही मला तूमचे लक्ष वेधून घेण्याचे आहे.कोणताही चित्रपट संपल्यावर चित्रपट निर्मितीच्या विविध टप्प्यावर गुंतलेल्या व्यक्तींची जी यादी येते त्याकडे            माझे असे निरीक्षण आहे की बहूसंख्य जण चिञपट संपल्यावर येणाऱ्या श्रेयावलीकडे साफ दूर्लक्ष करतात चिञपट तयार करणे हे सांघीक कार्य आहे आपल्यास पडद्यावर जितके लोक दिसतात त्याचा तुलनेत अधिक लोक पडद्यामागे कार्यरत असतात त्याचा कामाची दखल घेण्यासाठी चिञपटाची सांगता झाल्यावर दाखवण्यात येणारी श्रेयावली किमानपक्षी डोळ्याखालून घालणे आवश्यक आहे असे माझे प्रामाणीक मत आहे                   त्यातील काही जणांना विविध पुर...

कोण बघतो कश्यासाठी चित्रपट

इमेज
कोण मेले कोणासाठी रक्त ओकुन ? " या पक्तींचे एक अजरामर मराठी  गाणे आहे त्याच धर्तीवर कोण बघतो कशासाठी चिञपट ?असे म्हणावे अशा किशा  नुकताच माझ्या मिञांचा कट्ट्यावर घडला    तर त्याचे असे झाले की कट्ट्यावर खुप दिवसात चिञपट बघीतला नसल्याने सर्व जण मिळून चिञपटाला जाण्याचे ठरले मग कोणता चिञपट बघायला जायचे यावर चर्चा सुरु झाली माझ्या एका मिञाने थोडा गंभीर विषयावर असणाऱ्या चिञपटाला जावू असे सुचवले यावर दुसरऱ्या एका मिञाने आपण आधीच समस्येने ञासलो असताना परत टेशंन वाढवणाऱ्या गोष्टी का करायचा अशा मुद्दा मांडला त्यापेक्षा गमतीदार विषयाचा चिञपट बघण्याला प्राधान्य देणे महत्ववाचे असल्याचे सांगीतले तुम्हाला काय वाटते ?  धर्तीवर    चिञपट कोणत्या कारणासाठी बघायचे फक्त निव्वळ करमणूकीसाठी की ज्ञानवर्धक करमणूकीसाठी ? या माध्यमाचा समाजावर प्रचंड प्रमाणात परीणाम होतो आणि या माध्यमावर बाजारपेठेचा प्रचंड प्रभाव असतो जी आपण कोणते चिञपट बघतो यावर अवलूंबन असते              फक्त निव्वळ करमणुक महत्ववाची की ज्ञानवर्धक करमणूक ...

सदैव चिरतरुण असणारा चित्रपट, 'सिंहासन'

इमेज
आपल्या मराठी चित्रपटसृष्टीत मोठा आशय असलेले अनेक चित्रपट आहेत.दोघी, नितळ, देउळ, देउळबंद, दहावी फ, सामना ,सरकारनामा ही त्यातील काही मोजकी उदाहरणे. मराठी चित्रपटसृष्टीने जीवनाच्या प्रत्येक क्षेत्रावर आधारीत चित्रपट दिले आहेत. पत्रकारीतेचा विचार करता  हार्ड  बीट समजल्या जाणाऱ्या राजकारणावर आधारीत चित्रपट मराठीत आहेत. सरकारनामा, सिंहासन ही त्यातील प्रमुख उदाहरण म्हणता येईल  सिंहासन हा चित्रपट तर समस्त भारतीय भाषेतील उत्कृष्ट  चित्रपट म्हणता येईल.16 नोव्हेंबर 1979 रोजी रसिकांसाठी खुला झालेला  या  चित्रपटाला 46 वर्ष पूर्ण होतील मात्र आजदेखील या चित्रपटाचे कथानक रटाळ कालबाह्य वाटत नाही . किंबहुना आज आपण बातम्यांमध्ये ज्या राजकारणाच्या बातम्या बघतो ,त्याचे नाट्य रूपांतरण वाटावे इतका सजीवपणा या चित्रपटात जाणवतो ,     हा चित्रपट त्याच्या पहिल्या दृश्यापासून प्रेक्षकांना खिळवून ठेवतो  सध्याच्या छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस मुबई (त्यावेळचे  व्हिटोरीया टर्मिनस ) च्या परिसर त्याच्या पहिल्या दृश्यात दाखवला आहे जो सुरवातीला लॉंग  शॉर्ट  फोकस ...

कांदे पोहे!

इमेज
कांदे पोहे, आपल्या महाराष्ट्रीयन लोकांच्या अति परीचयातील पदार्थ. विवाह जूळवतांना  पुर्वी हमखास केला जाणारा पदार्थ. तर माझ्या सारख्या मुळच्या नाशिकमधील मात्र शिक्षण आणि नोकरीच्या निमित्त्याने पुण्यातील पेठांमध्ये बरेच काळ वास्तव्य केलेल्या व्यक्तींचा रोजच्या जगण्याची सुरवात करणारा पदार्थ. सहजतेने पाच मिनीटात तयार होणारा हा पदार्थ .सध्या बाजारात कांद्यांचे आणि शेगदाण्याचे भाव किती आहेत याचा बातम्या न बघता, बाजारात न जाता अत्यंत खराखुरा वृत्तांत सादर करणारा खाद्यपदार्थ म्हणजे कांदेपोहे. आपल्या चित्रपटसृष्टीत, साहित्य विश्वात कांदेपोहे हा मोठा विषय आहे.सनई चौघडे या मराठी चित्रपटात तर आयुष्य म्हणजे कढईतील करपलेले कांदेपोहे  असे सांगत, कांदे पोह्यांना आयुष्यातील भल्याबुऱ्या प्रसंगाशी जोडण्यात आले आहे. महाराष्ट्रात कधीही नाश्त्यासाठी मिळणारा पदार्थ म्हणजे कांदेपोहे.        तर गरमागरम कांदेपोहे आणि त्यावर  लिंबू पिळल्यावर असे कांदेपोहे खाणे हणजे रस्त्यावरचे स्वर्गसुख म्हणता येईल. मात्र काही कारणाने आपल्या महाराष्ट्रात सध्या या कांदा पोह्यांची वाट ल...

भारत म्यानमार मैत्रीचा सेतू आणि बॉलिवूड

इमेज
माझ्या जपान आणि बॉलिवूड यांच्यातील सहसंबंध दाखवणाऱ्या गाण्याविषयीच्या लेखानंतर अनेकांनी मला या सारखी अजून काही या सारखी गाणी असतील तर त्याविषयी तू लिहिलेले मला वाचायला आवडेल असे सांगितल्याने त्या विषयी सांगण्यासाठी प्रस्तुत लेखन .       मित्रांनो या प्रकारचे अजून एक गाणे भारताच्या स्वातंत्र्याच्या सुरवातीला चित्रीत करण्यात आले.1949 साली प्रदर्शित झालेल्या पतंगा या चित्रपटातील 'मेरे पिया गये हे रंगून, वहासे किया हे टेलिफोन' हे राजिंदर कृष्ण लिखित आणि सी रामचंद्र यांच्या संगिताने सजलेले हेच ते गाणे.शमशाद बेगम आणि सी रामचंद्र यांनी गायलेल्या या गाण्यातून नवरा बायको यांच्यातील अतूट प्रेम दाखवले गेले आहे.          सव्वा चार मिनीटांच्या कृष्णधवल गाण्यातूनच नव्हे तर पतंगा या चित्रपटातून त्यावेळच्या भारताच्या मित्र राष्ट्रांबाबत खुप माहिती मिळते‌.भारताला 15 ऑगस्ट 1947 ला स्वातंत्र्य मिळाले तर म्यानमारला 4 जानेवारी 1948 ला स्वातंत्र्य मिळाले .दोन्ही देशातील राजकर्त्यांना ब्रिटीश राजवटीत लयास गेलेल्या आपल्या देशाला विकसीत करण्याचे आव्हान होते. स्वातंत्र्य म...

जपानी कार्य कुशलतेवर अचूक भाष्य करणारे बॉलीवूड मधील गाणे

इमेज
व्यवस्थापन क्षेत्रात जपान आणि जपानी तंत्र अत्यंत महत्त्वाचे मानले जातात. जपानी कारखन्यात तयार झालेल्या वस्तू कितीही काटेकोरपणे तपासणी केली तरी चूक सापडणार नाही या प्रमाणात अचूक झालेल्या असतात, असे सहजतेने म्हटले जाते. जपानने हा मान मोठ्या कष्टाने मिळवला आहे.,हे सांगायला कोणत्याही तज्ञ व्यक्तीची आवश्यकता नसावी.सातत्याने होणाऱ्या भुकंपाला सक्षमपणे तोंड देत दुसऱ्या महायुद्धानंतर शद्बश: राख झालेल्या देशाने ही गौरवास्पद कामगिरी केली आहे.        जपानची ही कामगिरी किती उच्च दर्जाची आहे,हे आपण 1955 साली आलेल्या श्री 420 या चित्रपटातील राज कपुर यांच्यावर चित्रीत झालेल्या 'मेरा जूता है जपानी....फिर भी दिल है हिंदुस्थानी या सव्वाचार मिनीटात आपण सहजतेने बघू शकतो.  या गाण्यातील अन्य वाक्यांचा संदर्भ घेतल्यास आपणास त्या वेळच्या भारताच्या परराष्ट्र धोरण आणि जागतिकीकरणाविषयी बोलता येवू शकते जसे पॅट इंग्लडची आणि टोपी रशियाची मात्र मन मात्र पुर्णत: भारतीय या प्रमाणे. मात्र ते आपण क्षणभर बाजुला ठेवून परत येवूया जपानवर.     चित्रपटाची पटकथा आणि इतर...