नवीन भाषा , जुने शब्द
आज सकाळचीच गोष्ट आहे , सध्याच्या जीवनाचा काहिसा अविभाज्य भाग बनलेल्या व्हाट्सअप वरील एका गृपवरील मेसेज बघत होतो , गृपवर एका व्यक्तीने केलेल्या स्व कलालकृतीवर विविध लोकांनी प्रतिक्रिया दिल्या होत्या . अर्थात या सर्व प्रतिक्रिया म्हणजे दोन इमोजी होत्या . त्या दोन इमोजीच सर्वांनी आलपालटुन वापरल्या होत्या . त्यावेळी माझ्या मनात एक विचार चमकून गेला ." या इमोजीने आपल्या भाषेवर किती आक्रमण केले आहे . या इमोजी जर नसत्या तर लोक किती विविध प्रकारे अभिव्यक्त झाले असते आपल्या मराठीत या साठी कितीतरी शब्द आहेत , जसे अफलातून , छान , मस्त , झक्कास , एक नंबर , कडक , लई भारी , फक्कड , आणि मराठीत एक सुप्रसिद्ध गायक श्री . अवधूत गुप्ते यांनी आपल्या गाण्याच्या स्पर्धात्मक कार्यक्रमातून काहीसा रूढ केलेला शब्द अर्थात चाबूक . मात्र आता या सर्वांची जागा कोणी घेतली तर दोन चिन्हांनी . या ...