हीच ती का मराठी ?
गेल्या आठवड्याभरापुर्वीची गोष्ट आहे एका मित्राने मला फोन केला होता , नेहमीचे क्षेमकुशल झाल्यावर त्याने तूझ्याकडे अरे ते पुस्तक आहे का ? असा प्रश्न केला . मित्राने विचारलेले पुस्तक मराठीतील एक नामांकित पुस्तक होते . तेव्हापासून एक प्रश्न मला सातत्याने मनात येत आहे , की आपल्या मराठीत अनेक उत्तमोत्तम साहित्यकृती आहेत , ज्यावर अनेक दिर्घ कालावधीच्या मालिका सहजतेने तयार होवू शकतात , ज्या लहानमुलांसह प्रौढ व्यक्तीही सहजतेने बघू शकतील अस्या असताना अत्यंत कटकारस्थांनी भरलेल्या , विविध प्रकारचे गुन्हे सहजतेने दाखवणाऱ्या मालिका मराठीत का बनत आहेत . जे मालिकांचे तेच विनोदी कार्यक्रमाचे आपल्या मराठीत चि . वि जोशी , पु . ल . देशपांडे , व . पू . काळे , यांच्या सारखे सकस विनोदी लेखन करणारे साहित्य असताना महिलांचे कपडे पुरूषांनी घालणे , आणि विनोद निर्मिती करणे , यात काय हशील ? एकेकाळी वाईटपणाचा शिक्का बसलेल्य...