पोस्ट्स

जून, २०१९ पासूनच्या पोेस्ट दाखवत आहे

मला भावलेला श्रीमंत दासबोध

इमेज
  गेल्या काही दिवसांपासून मी ज्ञानेश्वरी आणि दासबोध वाचत आहे .   या दोन्ही ग्रंथांचा गोडवा अवर्णीयच वेगळाच आहे .  त्यातही दासबोधचा गोडवा मला तरी काही औरच आहे असे वाटते .  प्रामुख्याने त्याची   केलेली रचना ही गोष्टच .    त्याचे वेगळेपण दर्शवते ,   10 समासांचा एक दशक असे 20 दशक प्रत्येक समासात अत्यंत सोप्या भाषेत समाजात वावरताना व्यक्तीची वर्तणूक कशी असावी अथवा असू नये याचे वर्णन म्हणजे दासबोध , असे दासबोधाबाबत सोप्या भाषेत बोलायचे झाल्यास म्हणता येईल .                ज्ञानेश्वरीची भाषा जरी मराठी म्हटली तरी   काहिशी अवघड वाटते , याउलट गोष्ट   दासबोधाची आहे .   अत्यंत सोपी भाषा हे मला भावलेले दासबोधाचे आणखी एक वैशिष्ट सध्याच्या काळात सॉफ्ट स्किलला ( मराठी शब्द सुचवल्यास मला आनंदच होइल ) प्रचंड महत्व आलेले आहे ते शिकण्यासाठी लोक प्रचंड प्रमाणात पैसाही खर्च करत...

वाचनाचे नव्या जगातील स्थान

इमेज
  आज घरी टिव्ही बघत असताना एका ई बुक रिडर ची जाहीरात बघीतली आणी मनात विचार आला की वाचन ही संकल्पना किती बदलली आहे पुर्वी वाचन म्हटले की फक्त छापील मजकुर डोळ्यासमोर येत असे आता पुस्तक वाचन म्हणजे ईलेक्ट्रीक उपकरणाचा वापर करत केलेले वाचनच    समोर येते      पुस्तक ही संकल्पना पण सध्याचा काळात   किती बदलली आहे पुर्वी पुस्तके वाचली जायची आता पुस्तके वाचली जात नाही तर पुस्तके ऐकली जातात त्याला अॉडीयो बुक म्हणतात   श्री समर्थ रामदास स्वामी यांनी दिसांमंजी काही तरी लिहावे प्रसंगी अखंडीत वाचित जावे असे दासबोधात लिहले आहे . त्या काळात फक्त कागदावरची   पुस्तके होती   आणि तिही हाताने लिहलेली होती . छापलेली नसत . तरी त्यांनी वाचनाचे महत्व ओळखले होते                         छापलेली पुस्तके हातळण्यापेक्षा ई बुक हातळणे खुप सोईचे होते माझ्या स्वता :...

उत्कृष्ट वाचन म्हणजे ?

इमेज
  दिसामंजी काहीतरी लिहावे प्रसंगी अखंडित वाचित जावे शहाणे करून सोडावे सकल जन   असे   श्री समर्थ रामदास स्वामी   यांचे वचन आहे . माणसाने नेहमी ज्ञानप्राप्तीच्या साधनेत तरी असावे , किंवा दुसऱ्या व्यक्तीना ज्ञान देण्याच्या कार्यात मग्न असावे . अशा या वचनाचा अर्थ आहे                          आता ज्ञानप्राप्ति वाचनाने होत असली तरी या वाचनाचे विविध प्रकार आहेत . कोणी साहित्यकृती वाचून ज्ञानप्राप्ति करेल तर कोणी विविध प्रकारची पुस्तके मासिके आणि रोजची वर्तमानपञे वाचून आपली ज्ञानसाधना करेल . आता रोजची विस पंचवीस वर्तमानपञे विविध मासिके वाचणे म्हणजे वाचन समजायचे का हा वादाचा मुद्दा होइल काहींचा मते चांगल्या साहित्यकृतीचे वाचन म्हणजेच वाचन होय . मासिके वर्तमानपञे कितीही वाचली तरी ते वाचन नव्हे , असो . हा वादाचा मुद्दा बाजुला ठेवूया क्षणभर .          ...