खुप काही शिकवून जाणारे गाणे !
कालचीच गोष्ट आहे . एका ठिकाणी चह घेत असताना एका गाण्याचे बोल ऐकू आले . " झूट बोले कंवा काटे , काले कवेंसे बचीयो !...... में मायके चली जाउंगी ! तूम देखते रहिंयो !" नवऱ्या बायकोच्या लटक्या भांडणांवर आधारीत सन 1973 साली आलेल्या बाँबी या चित्रपटातील हे गाणे आपल्याला खुप काही शिकवून जाते असे मला वाटते . या गाण्यासाठी संगीतसाथ दिली आहे लक्ष्मीकांत प्यारेलाल यांनी आणि गायले आहे शैलेंद्र सिंग आणि लता मंगेशकर यांनी . खोटे बोलल्यामुळे काय होते ? यावरुन नवऱ्या बायकोत सुरू झालेल्या संवादात बायको नवऱ्याला ती विविध गोष्टी करेल , अश्या धमक्या देते . प्रत्येक वेळेस नवरा तीला प्रत्युतर देते . नंतर ती पत्नी आपले अखेरचे शस्त्र , माहेरी जाण्याची धमकी देते . यावेळी नवरा तू जात असेल तर जा , मी तूझी सवत घरी आणतो , असे तीला बजावतो . आपली सवत येणार , या प्रत्युतरामुळे बायको आपला हट्ट मागे घेत नवरा सांगेल तसे वागायचे मान्य करुन आपला हट्ट मागे घेते , अशी गाण्याच...