पोस्ट्स

मार्च, २०२१ पासूनच्या पोेस्ट दाखवत आहे

प्यासा, एक उत्कृष्ट चित्रपट !

इमेज
  कालच्या माझ्या " कागज के फुल " या चित्रपटावर मला तूझ्या आवडत्या चित्रपटावर लिही ना ? आम्हाला तूझा आवडत्या चित्रपटाविषयी वाचायला आवडेल असा अभिप्राय आल्याने माझ्या आवडत्या चित्रपटाविषयी   सांगण्यासाठी आजचे लेखन तर माझा अत्यंत आवडता चित्रपट आहे ,   ज्येष्ठ सिने निर्माते , सिनेदिग्दर्शक , अभिनेते , नृत्य दिग्दर्शक वसंतकुमार शिवशंकर पदूकोण अर्थात गुरुदत्त यांची प्रमुख भुमिका असणारा चित्रपट ज्याला टाइम्स मँगझीनतर्फे वीसव्या शतकातील सर्वात उत्तम 50 चित्रपटांच्या यादीत स्थान मिळाले आहे , असा कृष्णधवल चित्रपट " प्यासा ". अत्यंत जवळचे लोकसुद्धा आपल्याला आपल्याकडे किती पैसा आहे , यावरुनच आपले मुल्यमापन करतात . गुणांकडे दुर्लक्ष करतात   मात्र आपल्या गुणांमुळे आपल्याला जर भविष्यात पैसा मिळाला , आपला गौरव झाला तर आपल्या कष्टाच्या , धडपडीच्या वेळी   आपल्याला त्रास , अपमानास्पद वागणूक देणाऱ्या व्यक्ती , आम्हीच त्याला त्याचा धडपडीच्या काळात कसी मदत केली , याविषयी खोटे का असे...

चित्रपटश्रुष्टीचे काळे सत्य मांडणारा चित्रपट ,कागज के फुल!

इमेज
कालचीच गोष्ट आहे , सध्याचा महाराष्ट्राचा राजकारणाविषयी मित्राशी बोलताना जब्बार पटेल यांनी निर्मिती केलेल्या आणि मात्तबर अभिनेत्यांचा अभियननाने सजलेल्या   सिंहासनाचा विषय निघाला . आमचे बोलणे नंंतर थांबले , माझे मन मात्र वास्तवदर्शी चित्रपटाचा विषयी विचार करण्यात गढून गेले . आपल्या चित्रपटश्रुष्टीत वास्तवदर्शी चित्रपटांची मोठी संख्या आहे . सध्या अस्या चित्रपटांची संख्या वाढलेली दिसत असली , तरी वास्तवदर्शी चित्रपटांचा यादीत   कृष्णधवल काळातील चित्रपट असलेल्या " कागज के फुल " या चित्रपटाचा समावेश करावाच लागेल . किंबहूना गुरुदत्त   फिल्म प्राडक्शनची निर्मिती असलेल्या " कागज के   फुल " या चित्रपटाचा समावेश केल्याशिवाय ही यादी पुर्ण होवूच शकत नाही . एखादा यशस्वी चित्रपट दिग्दर्शक सातत्याने यशस्वी चित्रपट देत असताना चित्रपटश्रुष्टी त्याचाशी किती अबदीने वागते , मात्र एखादा अयशस्वी चित्रपट त्याचा हातातून घडल्यावर एकेकाळी डोक्यावर घेणारी चित्रपट श्रुष्टी त्याचाशी किती तूसडेपणान...