पोस्ट्स

फेब्रुवारी, २०२० पासूनच्या पोेस्ट दाखवत आहे

मी अनुभवलेल्या वृत्तवाहिन्या

इमेज
  काल रात्रीची गोष्ट आहे . नेहमीप्रमाणे भारतीय मनोरंजन वाहिन्यांवर तसेच भारतीय वृत्तवाहिनीवर रटाळपणा सुरू असल्याने मी टिव्हीवर आंतरराष्ट्रीय वृत्तवाहिन्या बघायला सुरवात केली . या सर्फिंग दरम्यान मला सिंगापूर येथील " चँनेल न्युज एशिया " या वृत्तवाहिनीवर Politics on climate change या नावाचा कार्यक्रम दिसला . त्या कार्यक्रमांमध्ये बदलत्या हवामान बदलामूळे पाकिस्तानातील गरीब जनतेला किती हाल अपेष्टांना सामोरे जावे लागतेय , गिलबिल बाल्टीस्तान , आझाद काश्मीर भागातील हिमनग किती वेगाने वितळत आहे . यावर भाष्य केले होते . कार्यक्रमात , काय सांगितले ? कोणावर टिका , केली ? यावर नंतर बोलेल . मला तूमचे लक्ष वेधून घेयचे आहे , ते कार्यक्रमाच्या विषयाकडे .            चँनेल न्युज एशिया या वृत्तवाहिनीवरील अस्या कार्यक्रमाला रिपोर्ताज म्हणतात . भारतीय दुरचित्रवाणी वाहिन्यांवर " रिपोर्ताज " हा प्रकार फारच अभावाने दिसतो . त्यातही भारतात दिसतो तो दुरदर्शनचा डि डी ...

नाम साधर्म्यच्या निमित्याने

इमेज
  कालचीच गोष्ट आहे . एका व्याख्यानाच्या निमित्याने मी एका सभागृहात बसलो होतो . व्याख्यान भारतीयांनी भारतीयांसाठी भारतात आयोजित केले असल्याने ते भारतीय प्रमाणवेळेनुसार सुरु होणार , हे ओघाने आलेच . व्याख्यान कोणत्या विषयाविषयी ,  होते ? व्याख्यानात वक्ता काय ,  बोलला ? या विषयी आपणास नंतर कधीतरी सांगेल . मला तुमचे लक्ष वेधायचे आहे . ते अन्य एका मुद्यावर . तर भारतीय प्रमाणवेळेनुसार सुरु होणाऱ्या या व्याख्यानाला मी   मात्र आमंत्रण पत्रिकेवर सांगितल्याच्या दहा   मिनटे आधी आल्याने   थोडा   वेळ घालवण्यासाठी शेजारी बसलेल्या व्यक्तीशी बोलणे सुरु केले . संबंधित व्यक्ती अहमदनगर जिल्ह्यातील शेवगाव या तालुकयातील एका गावाची रहिवासी होती . मात्र संबंधित व्यक्तीने तिची ओळख सांगताना अहमदनगर अशी सांगितली . मी नुकतीच अहमदनगर शहराला भेट दिली असल्याने , त्यांना अधिक बोलत करण्यासाठी मी तुम्ही माळवाडी परिसरातील का ? तुम्ही भिंगारला परिसरात राहता का ? तुम्ही तेली चौकात...

पर्यटनाच्या निमित्याने ......

इमेज
  आपण अनेकना सांगताना बघतो की ,  मी पर्यटनाच्या निमित्याने   अनेक भागांमध्ये , शहरात फिरतो . मात्र एका प्रश्नाचे ते अजिबात उत्तर देत नाहीत , तो म्हणजे पर्यटन करतात , म्हणजे   ते नक्की काय करतात ? ते ज्या नव्या प्रदेशाना भेटी देतात , तिथल्या लोकांमध्ये सहभागी होतात ? तेथील स्थानिक परिवहन व्यवस्थेने फिरतात की ? की तेथील ऐतिहासिक स्थळांना भेटी देतात ? मी स्वतः अनेकदा विविध राज्यांच्या परिवहन सेवा जसे गुजरात राज्य परिवहन महामंडळ , महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळ , मध्यप्रदेश राज्य परिवहन महामंडळ वगैरे . आदींनी फिरतो . मी संबंधित ठिकाणी फिरण्यासाठी प्रामुख्याने सध्या बसेस वापरतो . तसेच बसेसमध्ये शक्यतो खिडकीची जागा घेण्याचा माझा कल असतो . प्रवास रात्रीचा असेल तरी मी प्रवासात शक्यतो झोपत नाही . रात्रीच्या अंधारात काय बघतो ? असा सहप्रवाशांच्या प्रश्न असतो . मात्र मी खिडकीची जागा शक्यतो सोडत नाही . मला मी ज्या शहारत जातो , तेथील ऐतिहासिक स्थळांपेक्षा स्थानिक ...