मुंबई आताची ,आणि त्यावेळची !
मी जिथे चहा पितो , त्या चहाच्या टपरीवर सातत्याने जूनी गाणी वाजत असतात . दोन तीन दिवसापुर्वीचीच गोष्ट आहे . नेहमीप्रमाणे तिथे मी चहा पिण्यासाठी गेलो असता , एक अत्यंत उत्तम गाणे तिथे वाजत होते . " ए दिल मुस्किल है जिना यहा ,...... ये बाँम्बे हे मेरी जान !" गुरुदत्त प्राडक्शनची निर्मिती असलेल्या सि . आय . डी . या चित्रपटातील हे गाणे त्या वेळच्या मुंबईतील स्थिती कसी होती ? यावर छान भाष्य करते . हा चित्रपट सन 1956 रोजी प्रदर्शित झाला . त्यामुळे आपणास तेथील मुंबईची स्थिती समजते . आताची स्थिती कसी आहे ? हे आपण जाणतातच . नायक मुंबई किती वाइट आहे , यावर भाष्य करत असतो , तर नयिका मुंबई शहर किती उत्तम आहे , यावर भाष्य करुन त्यास नामोहरण करते . असी गाण्याची मध्यवर्ती कल्पना आहे . जाँनी वाकर आणि वहीदा रेहमान यांच्यावर चित्रीत झालेल्या या गाण्याचे गीतकार आहे गीता दत्त आणि मोहमद्द रफी . गाण्याचे संगीतकार आहेत ओ पी नय्यर . सुमारे 4 मि...