आयुष्य समृद्ध करणारी बुद्धिबळ स्पर्धा
मागील महिन्यात अर्थात एप्रिल महिन्यात शेवटच्या आठवड्यात नाशिक महाराष्ट्र बुद्धिबळ संघटना आणि नाशिक जिल्हा बुद्धिबळ संघटनेच्या संयुक्त विद्यमाने राष्ट्रीय जलद आणि अति जलद बुद्धिबळ स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते . या शिवधनुष्यासमान असणाऱ्या स्पर्धेच्या आयोजनात खारीचा वाटा माझ्या देखील होता . मला या स्पर्धेच्या आयोजनतेतील सहभागाने खूप काही शिकवले . लोकांचे वेगवेगळे अनुभव . एखादा मोठा सोहळा आयोजित करताना कोणकोणत्या अडचणी येऊ शकतात . त्यावर डोकयावर बर्फ आणि तोंडात साखर ठेवून यशस्वीपणे मात कशी करायची याचे प्रात्यक्षिकासह शिक्षण मला या स्पर्धेच्या आयोजनातील सहभागामुळे कोणताही खर्च न करता मोफत मिळाले नाशिकरोड येथील महाराष्ट इव्हायर्मेंट इंजिनीरिंग ट्रेनींग आणि रिसर्च अकेडमीच्या ( मित्रा ) प्रांगणात झालेल्या राष्ट्रीय बुद्धिबळ स्पर्धेचे एका शब्दात वाक्यात वर्णन करावयाचे झाल्यास आयुष्य समृद्ध करणारी बुद्धिबळ स्पर्धा असेच करावे लागेल . ...