गेली ती नाशिक पुणे रस्त्यातील रंजकता
आजचीच गोष्ट आहे . सहजच व्हाँटसपवर बघत असताना एका व्हाँटसप ग्रुपवर एक पोस्ट दिसली . पोस्टमध्ये मुंबई आग्रा राष्ट्रीय महामार्गावर झालेले बदल आणि त्यामुळे प्रवाश्यातील मज्जा कशी संपली , हे सांगितले होते . पोस्ट वाचल्यावर मी सातत्याने प्रवास करत असलेल्या नाशिक पुणे रस्त्यातील गेल्या काही वर्षापासुन झालेले बदल डोळ्यासमोरुन झरझर जावू लागले . ते आपणापर्यत पोहचवण्यासाठी आजचे लेखन . नाशिक पुणे रस्त्यातील चंदनापरी घाटाची मज्जा काही औरच असायची . तेथील वेडीवाकडी वळणे , गणपतीची मुर्ती याची गंम्मतच काही और होती . नाशिककडून येताना घाटातील अवघड टप्पा चांगल्या पद्धतीने पार पडल्याबद्दल आभार मानायला आणि पुण्याकडून येताना हा टप्पा चांगला पार पडण्यासाठी प्रार्थना करण्यासाठी अनेकांचे हात सहजतेने जोडले जात असे . मी गमतीने मनोमनी घाटात घाट चंदनापुरी असे माझ्या मित्रांना म्हणत असे . चंदनापुरी घाटातून पुण्याकडे जाताना दिसणारे ...