जीना इसीका नाम है!
आज सकाळीच गोष्ट आहे . सकाळी एके ठिकाणी चहा पित असताना एका जून्या हिंदी चित्रपटाची धून कानावर ऐकू आली ." जिना इसिका नाम है !" आयुष्य कसे जगावे हे सांगणारे हे गाणे असेच या गाण्याच्या बाबतीत म्हणावे लागेल . राज कपूर यांच्या अनारी या 1959 साली आलेल्या चित्रपटातील मुकेश यांंनी गायलेले हे गाणे . ललीता पवार आणि शोभा खोटे या मराठमोळ्या अभिनेत्रींनी काम केलेला हा चित्रपट मुकेश यांनी त्यांचा कारकिर्दीत जी दुःखी भावनेच्या व्यतिरीक्त जी गाणे गायली त्या पैकी एक असणारे हे गाणे . ज्याला शंकर जयकिसन यांनी संगीत दिलेल्या या गीताचे बोल शैलेंद्र यांचे होते . स्वतःच्या दुःखांंना कुरवाळत बसण्यापेक्षा इतरांच्या आयुष्यात आनंद झटण्यातच खरा आनंद आहे , हा अत्यंत महत्तवाचा संदेश या गाण्यातून देण्यात आला आहे . गाण्यामध्ये नायकाकडे पैसे नसतात मात्र तो भिकाऱ्याला आनंद देतो , त्यामुळे तो भिकारीच स्वखुशीने त्याला ...