पोस्ट्स

मार्च, २०२५ पासूनच्या पोेस्ट दाखवत आहे

नात्यातील ढोंगीपणा उघड करणारे गाणे

इमेज
आपल्या भारतातील चित्रपटांतील महत्तवाचा भाग म्हणजे त्यातील गाणी. जगात इतर भागातील चित्रपटांमध्ये गाणी शक्यतो आढळत नाही. भारतीय चित्रपटांत प्रामुख्याने आढळणाऱ्या या गाण्यातून मानवी जीवनाच्या सर्वच अंगाना स्पर्श केलेला आढळतो.  या गण्यातून ज्या प्रकारे मानवी आयुष्यातील रंजकता, सकारात्मक बाजू दाखवण्यात येते त्याचप्रमाणे मानवी आयुष्यातील दाहकता कटु सत्य मानवी आयुष्यातील वास्तविकता देखील तितक्याच प्रभावीपणे दाखवण्यात भारतीय चित्रपटातील गीते यशस्वी झालेली दिसतात.      याच मानवी आयुष्यातील कटू बाजू दाखवणारे एक प्रसिद्ध गाणे म्हणजे श्रेष्ठत्तम  बॉलीवूड चित्रपट निर्माते,दिग्दर्शक, अभिनेते  गुरुदत्त निर्मित  प्यासा या चित्रपटातील 'ये दुनिया अगर मिल भी जाये तो क्या है!' हे गाणे .तसे बघायला गेलो तर प्यासी मधील सर्वच गाणी मानवी आयुष्यातील ऋणात्मक बाजू आपल्या समोर आणत असली तरी मला 'ये दुनिया अगर मिल भी जाये तो क्या हे' हे गाणे विशेष मनाला भावते.     मानवी नाते मुख्यत: स्वार्थावर अवलूंबन असतात.त्यात जिव्हाळा ममत्व यांचा फक्त दाखवण्यपुर...

मानवी आयुष्यातील छंदाचे महत्त्व स्पष्ट करणारा चित्रपट,' जब वी मेट'

इमेज
             चित्रपट हे मोठे सशक्त माध्यम आहे‌.मनोरंजनाबरोबर चित्रपटातून मोठा संदेश देता येतो, आणि तो देण्यात येतो देखील. निव्वळ टाईमपास फालतू प्रेमकथांचे चित्रपट म्हणून ज्या बॉलिवूडचा उल्लेख होतो ते देखील याला अपवाद नाहीये. बॉलिवूडच्या चित्रपटातून जीवनाविषयक अनेक बाबी आपणास समजतात. याच मालिकेतील  जीवनाबाबत मोठे शिक्षण देणारा एक उत्कृष्ट  चित्रपट म्हणून 25 ऑक्टोबर 2007 रोजी प्रदर्शित झालेला 'जब वी मेट' कडे बघता येईल.         स्वत:च्या निर्णयाची जवाबदारी स्वत:कडे  कोणत्या प्रकारे घेयची‌.ते निर्णय फसले  तरी त्याबाबत दुसऱ्याला  दोष न देता त्याही स्थितीत स्वतः अपयशाची  जबाबदारी घेत, त्याला हसत हसत सामोरे  कसे जायचे.आयुष्यात छंदाचे महत्त्व काय असते? हे महत्त्वाचे संदेश या चित्रपटातून देण्यात आले आहेत.       मनुष्य त्याच्या रोजच्या जगण्यात कितीही व्यस्त असला तरी मनुष्याने त्याच्या छंदासाठी काही वेळ काढला पाहिजे.छंदामुळे वेळ वाया जात नाही, तर व्यक्तीस रोजच्या ज...

डिजीटल कचराय् नम:

इमेज
    सध्याचा अति जलद दळणवळणाचा काळात, आपल्याकडे एका विशिष्ठ प्रकारचा कचरा मोठ्या प्रमाणात जमा होत असतो.कचरा आणि दळणवळण ,चमकलात ना? कचराचा आणि दळणवळणाचा काय संबंध ,आपण काहीतरीच वाचत नाही ना, असे आपणास वाटू शकते.तर सांगतो हा आहे डिजीटल कचरा.आपल्या मोबाईल मेमरीतील नको असणारे मात्र डिलीट न केलेले व्हिडीओ, फोटो, व्हाटसप सारख्या सोशल मिडीयाचा वरील बऱ्याच दिवसात न उघडलेले ग्रुप यातून हा कचरा निर्माण होतो. हे सर्व निर्माण होण्यासाठी प्रगत दळणवळ मोठी सहाय्यक भूमिका बजावते हे आपण जाणताच.या प्रगत दळणवळणामुळे जगाच्या कानाकोपऱ्यात काढण्यात आलेला व्हिडिओ किंवा फोटो क्षणार्धात आपल्या मोबाईल मेमरीचा भाग होतो.आणि डिजीटल कचऱ्याच्या निर्मितीस भाग होतो.त्याचप्रमाणे सोशल मिडीयातील गेल्या कित्येक दिवसात न उघडलेले विविध ग्रुप देखील डिजिटल कचऱ्याच्या निर्मितीत मोठा हातभार लावतात.जरी ठराविक कालावधीनंतर मेसेज डिलीट करण्याची सोय असली तरी तूम्ही disapring हे फिचर्स वापरल्याने हा मेसेज डिलीट झाला आहे हे दाखवत त्या मेसेजची आठवण आपणास करत हे मेसेज डिजीटल  कचऱ्याची निर्मिती करत आपला फोन विनाक...

सांगा कसं जगायचं ?

इमेज
आपल्या मराठीत उत्तमोत्तम कवितांची मोठी परंपरा आहे.फक्त मनोरंजन करणाऱ्याच नव्हे तर जीवनाचे सार मांडणाऱ्या कविता आपल्या मराठीत आढळतात.याच सर्वोत्तकृष्ट कवितेत समाविष्ट होणारी कविता म्हणजे ज्येष्ठ कवि मंगेश पाडगावकर यांनी लिहलेली कविता  'सांगा जगायच कसं, कण्हत कण्हत की गाणे म्हणत' ही पावणेतीन मिनीटात पुर्णत: गावू शकणारी कविता. मंगेश पाडगावकरांनी जेमतेम पावणेतीन मिनीटात जगण्याचे तत्त्वज्ञान या कवितेत मांडले आहे‌. ऐकणाऱ्याला पुर्णत: सकारात्मता शिकणारी कविता प्रत्येकाने मुखोग्गद करून, जेव्हा जेव्हा त्याच्यावर अडचणी येतील, तेव्हा ती म्हटल्यास आत्महत्या नक्कीच टळतील.नैराश्यावरचे रामबाण औषध म्हणून या कवितेकडे बघता येवू शकते.        हे सांगायचे कारण व्यवसायाने मुख्याध्यापक असलेल्या, ज्यांचे पती वन खात्यात उच्चपदस्थ आहेत अस्या जळगाव शहरातील एक भगिनी.ज्यांचे कर्करोगाने नुकतेच दुर्देवी निधन झाले आहे. त्यांनी मृत्यूपूर्वी लिहिलेली फेसबुक पोस्ट सध्या सोशल मिडीयात विशेष चर्चित आलेली पोस्ट.स्वत:चा मृत्यू समोर दिसत असताना , लोकांना लिहिलेली ती पोस्ट हाच सक...