माझे आवडते गाणे !
आनंद या चित्रपटातील गाण्याविषयीच्या माझा पोस्टवर प्रतिक्रिया देताना एकाने मला तूझ्या आवडत्या गाण्याविषयी वाचायला आवडेल . असी प्रतिक्रिया दिल्याने माझ्या आवडत्या गाण्याविषयी सांगण्यासाठी आजचे लेखन . तर माझे आवडते गाणे आहे , जब वी मेट या चित्रपटातील " तूमसे ही " हे गाणे . मोहित चौहान यांच्या आवाजात रेकाँर्ड केलेले , आणि प्रितम यांनी संगीतबद्ध केलेले गाणे . ज्या गीताची रचना इर्शाद कामील यांनी केली होती . युवा उद्योजक आदित्य कश्यप यांनी नैराश्यातून बाहेर पडत उद्योगाची घडी पुन्हा नव्याने बसवताना गायलेले हे गाणे . सर्व प्रकारच्या व्यस्ततेतून मोकळा वेळ काढत आपल्या छंदाला मोकळा वेळ देत गायलेले गाणे . म्हणजे हे गीत . या गीतानंतर चित्रपट संपुर्ण 180% फिरतो . आतापर्यत नैराश्यामुळे सर्वकाही सोडून विनम्सक अवस्थेत फिरत , प्रसंगी आत्महत्येचा प्रयत्न केलेला युवा उद्योजक स्वतःच्या आयुष्यात नव्याने रंग भरतो , आपल्या अडचणी सो डवण्याचा नव्याने पुर्णतः उत्साहात प्रयत्न करायला लागत...