जाने क्यू ?
दिनांक ९ आणि १० जूनला ला मला माझे दोन जूने सध्या संपर्कात नसणारे मिञ भेटले होते त्यातील एकाशी माझा एकाशी चांगली मैञी होती . तर एकाशी सर्वसाधरण मैञी होती . सर्वसाधरण मैञी असणाऱ्या मिञाचा महाविदयालयीन अभ्यासात एक विषय कच्चा होता , तर दुसरा विषय माझा कच्चा होता . एकमेकांचे कच्चे विषय माञ दुसऱ्याचे हुकुमी विषय होते . त्यामुळे अभ्यासात मदत करताना आमची मैञी झाली . कांलातराने महाविद्यालयीन शिक्षण संपल्यावर आमचे भेटणे कमी होत होत बंद झाले , आणि जवळपास 4 वर्षांनी तो मला भेटला . दुसऱ्याची मेञी माञ सहज अश्या कोणत्याही कारणाविना झाली होती , हा मिञ माझे महाविद्यालयीन शिक्षण संपून 5 वर्षे झाले तरी अजून चांगल्या संपर्कात आहे . जरी प्रत्यक्ष भेटणे होत नसले तरी व्हॉटसप फेसबुक , एस एम एस च्या माध्यमातून संपर्कात आहे तर हे दोन्ही मिञ मला अचानक भेटले . दोन्ही वेळेस आम्ही हॉटेलमध्ये गेलो ज्या मिञासी अभ्यासातील काठ...