पुरुषांसाठी महिला किती आवश्यक आहे, हे स्पष्ट करणारे गाणे, 'इसलिये लडकिया, लडकोंसे...


आपल्या हिंदी चित्रपटसृष्टीत अनेक उत्तमोत्तम गाणी आहेत. काही गाणी त्याला दिलेल्या संगीतामुळे उत्तम या प्रकारात मोडतात. काही गाणी ती ज्या पार्श्वभुमीवर चित्रीत झालेली आहेत, त्यामुळे काही गाणी छान वाटतात. तर काही गाणी त्यातून देण्यात आलेल्या संदेशामुळे सर्वोत्तम श्रेणीत मोडतात.या सर्वोत्तम श्रेणीत मोडणारे एक गाणे म्हणजे, २००४ मे मध्ये प्रदर्शित झालेल्या 'हम तूम' या चित्रपटातील एक गाणे‌. पुरुषांच्या आयुष्यातील महिलांचे महत्त्व अधोरेखित करणारे 'इसलिये लडकीया लडकोंसे नही होती,हे गाणे.

जतीन -ललित या सुप्रसिद्ध जोडीने संगीतबद्ध केलेले आणि अलका यागनिक- शान यांनी आवाज दिलेले हे गाणे, चित्रीत झाले आहे, राणी मुखर्जी आणि सैफ अली खान वर. अभिनयाच्या क्षेत्रात महत्त्वाचा मानल्या गेलेल्या
आवाजात दोष असून देखील त्यावर मात करत एकेकाळी बॉलिवूडमध्ये स्वत: चे स्थान निर्माण करणारी अभिनेत्री म्हणून राखी मुखर्जी ओळखल्या जातात. त्यावर स्वतंत्र्यपणे लिहता येऊ शकते, मात्र तूर्तास इतकेच.

सहा मिनीटे इतक्या मोठ्या कालावधीचे गाणे परदेशात चित्रीत झाले आहे‌. सुरवातीला सैफ महिला किती त्रासदायक आहेत‌. महिला पुरुषांशी कसे वागतात, याचा पाढा वाचतो, त्यावेळेस राणी मुखर्जी त्याच्याकडे पुर्णत: दुर्लक्ष करते. सैफ राणी मुखर्जीच्या आसपास घुटमळतो.मात्र राणी मुखर्जी तीचे रुटीन सुरुच ठेवते.  त्यानंतर  राणी मुखर्जी महिलांमुळे पुरुषांच्या जीवनात कोणकोणते सकारात्मक बदल होतात ? महिलांमुळे पुरुषांचे सामाजिक जीवन कोणत्या पद्धतीने सुधारते? पुरुषच महिलांच्या मागे मागे कसे करतात? महिलांमुळे पुरुषांचे जीवन सुसंस्कृत होते?  आदी गोष्टी सांगून त्यास निरुत्तर करते.अखेर सैफ काहीसी माघार घेत all right ,all right इसमे झगडनेकी क्या बात है, असे म्हणतो आणि गाणे संपते.

प्रत्येक यशस्वी पुरूषाचा मागे स्त्रीचा हात असतो,असे म्हटले जाते. त्याची खात्री हे गाणे ऐकताना होते. हिंदी चित्रपटसृष्टीचा विचार करता, महिलांच्या पुरुषाच्या आयुष्यातील सकारात्मक सहभागावर तीन गाणे प्रामुख्याने भाष्य करतात. त्यातील पहिले म्हणजे  'जाने लोग प्यार क्यु करते हे, हे गाणे दुसरे गाणे म्हणजे हे गाणे तर
तिसरे म्हणजे वेक अप सिड या चित्रपटातील 'इकतारा हे गाणे‌ त्यातील पहिल्या दोन गाण्यावर मी लिहले आहे. या वेक अप सीड मधील गाण्यावर भविष्यात लिहीलीच.तोपर्यत ज्यांना  ना जाने लोग प्यार क्यु करते है, या गाण्यावर मी लिहलेला लेख वाचायचा आहे, त्यांनी पुढील लिंकवर क्लिक करा.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

मानवी आयुष्यातील छंदाचे महत्त्व स्पष्ट करणारा चित्रपट,' जब वी मेट'

जाने क्यू .....