आपल्या देवाविषयीच्या संकल्पना विस्तारणारे गाणे,
दोनच दिवसांपूर्वीची गोष्ट आहे . व्हाट्सएपच्या एका ग्रुपवर मराठीत नुकत्याच प्रदर्शित झालेल्या देऊळबंद २ या चित्रपटावर चर्चा सुरु होती.चर्च करता करता गाडी याच चित्रपटाच्या नावाशी सारखेपणा असलेल्या देऊळ या चित्रापाशी येऊन थांबली .चर्चा भुरकट आहे हे लक्षात अळ्यांचे ऍडमिनने चर्चा लगेच थांबवली .मात्र त्यावेळी माझ्या मनात सुरु असलेले विचार चक्र अजून सुरूच आहे .तसे बघायला गेले तर हा विषय आपणास काही नवीन नाही हिंदीतील गोष्टच सोडा आपल्या मराठीत देखील हा विषय कल्पकतेने मांडण्यात आला आहे . आपल्या मराठीच्या उत्तमोत्तम गाण्याच्या खजिन्यातील एक असलेले 'देव देव्हाऱ्यात नाही देव नाहोती देवालयी' हे झाला महार पंढरीनाथ या चित्रपटातील गाणे हे याचे एक उत्कृष्ट उदाहरणच म्हणता येईल ‘देव देव्हाऱ्यात नाही, देव नाही देवालयी’ हे मराठी गाणे आपल्यास काय सांगते ? याचा एका ओळीचा सारांश सांगायचं झाल्यास, देव ही केवळ मूर्ती, मंदिर किंवा देव्हाऱ्यात मर्यादित असलेली संकल्पना नाही. उलट, देव हा प्रत्येक सजीवात, प्रत्येक चांगल्या कृतीत आणि माणसाच्या अंतःकरणात वास करतो. आपण अनेकदा देवा...