पोस्ट्स

मे, २०२६ पासूनच्या पोेस्ट दाखवत आहे

समस्या सारखीच, फक्त माध्यमात फरक

इमेज
कालच मला व्हाट्सअप वर एक व्हिडिओ दिसला. व्हिडिओमध्ये आजची तरुण पिढी  झेन झी ही इंटरनेटच्या आहारी गेल्यामुळे कसे देशाचे वाटोळे होत आहे, यावर साधरणत:सत्तरीच्या वयाचे आजोबा चिंता करत होते. तो व्हिडीओ बघत असताना, मला का जाणे कुणास ठाउक, माझ्या नाशिकच्या कवीवर्य कुसुमाग्रजांच्या कवितेतील ओळी आठवायला लागल्या. 'तरुणाईचे बळ देशाचे जपा वाढवा तरुपरी । करमणुकीच्या गटारगंगा त्यात तयाला क्षाळु नका ॥' कुसुमाग्रजांच्या सुप्रसिद्ध 'स्वातंत्र्य देवतीची विनवणी' या कवितेतील या ओळी व्हिडीओशी देखील मेळ खात होत्या. आजोबा तरुणाईच्या व्यसनाविषयी बोलत होते, आणि कवीवर्य कुसुमाग्रज देखील आजपासून २९ वर्षापुर्वी याच तरुणाईला वेळ वाया घालण्यापासूं परावृत्त करण्याच्या प्रयत्न करत होते.तशी ती संपूर्ण कविताच विचार करण्यासारखी आहे.गेल्या ३०वर्षात परिस्थिती किती सुधारली (किंबहुना बिघडली)याचा विचार करणारा स्वतंत्र लेखाचा विषय होईल.मात्र तूर्तास आपण तो विषय बाजुला ठेवूया.असो तर कविवर्य कुसुमाग्रजांनी त्या वेळच्या निरर्थक गोष्ट्रीत तरुणाईने वेळ वाया घालवू नये.तरुणाईने करमणूकीला कमी महत्त्व देत द...

मनोव्यथा राजहंसाची

इमेज
 काही दिवसापूर्वी मराठीतील एक सुप्रसिद्ध साहित्यकार गजानन दिंगबर माडगूळकर अर्थात ग . दि .मा यांच्या पुणे शहरातील बंगल्याविषयीच्या उलट सुलट बातम्या सोशल मीडिया आणि न्यूजपेपरमध्ये ‘आपण वाचल्या असतीलच. मला त्या वादात पडायचे नाही.  गीत रामायण सारखी अवीट भक्तीने भरलेली रचना करणाऱ्या या साहित्यिकाच्या  गीत रामायण सोडून अनेक साहित्यकृती देखील  या अक्षरशः जीव ओवाळून टाकण्यासारख्याच आहे यातलीच एक प्रसिद्ध कविता म्हणजे, ' एका तळ्यात होती,बदके पिल्ले सुरेख,होते कुरूप वेडे पिल्लू तयात एक' इतरांच्या पेक्षा वेगळी प्रतिभा असलेल्या व्यक्तींच्या प्रतिभेची समाजाकडून यथोचित दाखल घेतली न गेल्याने त्यांना काय त्रास सोसावा लागतोय हे एका बदक आणि राजहंसचे प्रतीक वापरत अत्यंत सोप्या भाषेत यातगदिमांनी मांडलंय . आपण जर समाजाकडे उघड्या डोळस नजरेने बघितले तर अशी प्रतिभेची योग्य प्रकारे दाखल न घेतलेली अनेक राजहंस  दिसतात. आपल्यापेक्षा कमी प्रतिभा असलेली माणसे आपल्या पुढे जात आहेत हे बघताना त्यांच्या मनाची काय अवस्था होत असेल हे आपण त्या गाण्यातून समजावून घेऊ शकतो .       ...

आयुष्यातली आणि भारतातील राजकारणाची वस्तुस्थिती मांडणारे ३ 'स'

इमेज
आयुष्यातली आणि भारतातील वस्तुस्थिती मांडणारे ३ 'स' हे शीर्षक वाचून गोंधळात पडला ना ? हे कसले शीर्षक ?/ ' 'स' या मुळाक्षराचा आणि आयुष्यातील आणि भारतातील वस्तुस्थितीचा काय तो संबंध ? बरे असेल काही संबंध मात्र त्यात ३ या आकड्याच्या संबंध तो काय ? असे एक ना अनेक प्रश्न आपल्या मनात  हे शीर्षक बघून आले असतील तर सांगतो मी या लेखात बोलणार आहे तीन मराठी चित्रपटांविषयी. या तिन्ही चित्रपटांच्या सुरुवातीचे अक्षर आहे 'स' . या तिन्ही चित्रपटांमधून काय संदेश  देण्यात आला आहे.याचा विचार करता त्यातील एक चित्रपट आयुष्यात कोणत्याही गोष्टीचा अतिरेक वाईट असतो अगदी चांगल्या गोष्टीच्या आहारी गेले तरी आयुष्याची मातीच होते हे सांगतो. तर राहिलेले दोन चित्रपट राजकारणी आणि सार्सामान्य जनता आणि राजकारणी व्यक्तींमधील एकमेंकांवर कुरघोडी कोणत्या पद्धतीने करतात यावर भाष्य करतात  तसे बघायला गेले  तर या चित्रपटात सांगण्यात आलेले संदेश अनेक चित्रपटातून देण्यात आलेले आहेत या तिन्ही चित्रपटांच्या नावाची सुरुवात जशी 'स' या अक्षरापासून होते तसेच साम्य देखील या चित्रपटांतून आपण दिसू शकते तर...