कश्यासाठी वाचनासाठी
कालचीच गोष्ट आहे, मी सहजच टीव्हीवर सर्फिंग करत असताना लोकसभा टीव्ही या वाहिनीवर एक साहित्यिकांच्या मुलाखतीचा कार्यक्रम दिसला , अन मनात विचार आला, टीव्हीसारख्या ताकदवान माध्यमांचा साहित्यप्रसार अश्या गोष्टीसाठी वापर फक्त सरकारी मालकीच्या वाहिन्यांनीच का करावा ? नाही म्हणायला नेटवर्क 18लोकमत या वाहिनीवर सुमारे पाच वर्षांपूर्वी दर रविवारी साहित्यीकांचा मुलाखतीचा कार्यक्रम लागत असे . (त्यावेळी या वाहिनीचे नाव आय बी एन लोकमत होते ) मात्र सध्या तो कार्यक्रम बंद आहे त्यामुळे माझ्या
माहितीत
लोकसभा टीव्हीवरील सदर कार्यक्रम वगळता
, पुस्तके आणि साहित्यिकांचा बाबत
दुसरा कार्यक्रम नाही . जर असेल तो
या पोस्टच्या खाली सांगावा ?
त्याचप्रमाणे डीडी नॅशनलवर 'किताबनामा
हा कार्यक्रम प्रकशित होत असे मात्र
ते देखील सरकारी मालकीचेच ठरते ना .
विविध वृत्तपत्रातून आणि काही नियतकालिकांमधून नवीन प्रसिद्ध झालेल्या पुस्तकांची माहिती येते .मराठीतील तुरळक अशी फक्त याचसाठी प्रकाशित होणारी काही नियतकालिके मला माहिती आहेत . आणि अशी नियतकालिके मला नाशिकमध्ये द दिसत नाही . पुण्यामध्ये काही प्रमाणात दिसतात . मात्र प्रिंट
माध्यमांपेक्षा अधिक बलशाली असणाऱ्या इलेट्रीक चॅनेलवर मात्र या बाबाबत अनास्थाच जास्त दिसतेय . कोणतेही माध्यम हे आर्थिक बाजूच्या विचार करूनच चालवले जात असले तरी कोणत्याही टीव्ही चॅनेलला यात रस वाटू नये ? हे आपले दुर्दैव नाही का ?नाही म्हणायला चित्र फारच वाईट नाही , फेसबुक , व्हाट्सअप आधी समाजमाध्यांव्दारे पुस्तकांबाबत चर्चा केली जाते . स्टोरी टेल , प्रतिलिपी सारखी अँप यासाठी आहेत . मात्र याला काही प्रमाणात मर्यादा आहेत . इलेट्रीक वाहिन्यांसारखी याला सहजता नाही . त्यामुळे या सर्व माध्यमांमुळे जरी काही प्रमाणात पुस्तकांचा परिचय होत असला तरी इलेट्रीक वाहिन्यांचे अपयश लपत नाही . काही म्हणतीलसरकारी वाहिन्यांवरील का होईना पुस्तकाविषयी कार्यक्रम आहेना ? मला



टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा