डिजीटल कचराय् नम:

   
सध्याचा अति जलद दळणवळणाचा काळात, आपल्याकडे एका विशिष्ठ प्रकारचा कचरा मोठ्या प्रमाणात जमा होत असतो.कचरा आणि दळणवळण ,चमकलात ना? कचराचा आणि दळणवळणाचा काय संबंध ,आपण काहीतरीच वाचत नाही ना, असे आपणास वाटू शकते.तर सांगतो हा आहे डिजीटल कचरा.आपल्या मोबाईल मेमरीतील नको असणारे मात्र डिलीट न केलेले व्हिडीओ, फोटो, व्हाटसप सारख्या सोशल मिडीयाचा वरील बऱ्याच दिवसात न उघडलेले ग्रुप यातून हा कचरा निर्माण होतो. हे सर्व निर्माण होण्यासाठी प्रगत दळणवळ मोठी सहाय्यक भूमिका बजावते हे आपण जाणताच.या प्रगत दळणवळणामुळे जगाच्या कानाकोपऱ्यात काढण्यात आलेला व्हिडिओ किंवा फोटो क्षणार्धात आपल्या मोबाईल मेमरीचा भाग होतो.आणि डिजीटल कचऱ्याच्या निर्मितीस भाग होतो.त्याचप्रमाणे सोशल मिडीयातील गेल्या कित्येक दिवसात न उघडलेले विविध ग्रुप देखील डिजिटल कचऱ्याच्या निर्मितीत मोठा हातभार लावतात.जरी ठराविक कालावधीनंतर मेसेज डिलीट करण्याची सोय असली तरी तूम्ही disapring हे फिचर्स वापरल्याने हा मेसेज डिलीट झाला आहे हे दाखवत त्या मेसेजची आठवण आपणास करत हे मेसेज डिजीटल  कचऱ्याची निर्मिती करत आपला फोन विनाकारण हळू करतात याचा अनुभव आपण अनेकदा घेतला असेलच.
बरं या डिजीटल कचऱ्याची मोठी गंमत असते जेव्हा आपण एखादा व्हिडिओ तयार करतो त्यावेळी आपल्याला मोठा आनंद झाला असतो आपला तो आनंदाचा क्षण इतरांपर्यत अत्यंत उत्सुक असतो या आनंदाचा प्रसंग टिपण्यासाठी आपण सलग चार ते पाच फोटो क्लिक करतो त्यातील एखादाच पुढे पाठवतो बाकीचे मोबाईलमधील मेमरीची जागा अडकवत मोबाईलमध्ये बसून राहतात. तसेच आपण ज्यांना व्हिडीओ पाठवतो ते देखील आपला व्हिडीओ बघतात आपल्याला इमोजी पाठवतात आणि आपापल्या कामात व्यस्त होतात. त्यामुळे होत कायं आपला व्हिडीओ त्याच्यासाठी डिजीटल कचरा म्हणून मागे रहातो 
हे व्हिडीओ फोटो काढताना आपणाला ज्या स्तरावरचा आनंद झाला असतो त्याच प्रकारचा आनंद तो व्हिडीओ फोटो काही कालावधीनंतर बघताना वाटणे अशक्यच किंबहुना शी, किती घाण दिसत होतो/होते मी त्या वेळी असीच भावना निर्माण होण्याचीच शक्यता अधिक मात्र या उलट त्यावेळच्या रम्य आठवणी आठवत वर्तमानातले दु:ख विसरुन पुन्हा पुर्वीसारखे आनंदाचे क्षण येतील असा विश्वास देखील मनात निर्माण होवून या सकारात्मकतचे विचार देखील मनात येवू शकतात.या सकरात्मकतेमुळे कामात सुधारणा होवून भविष्यात खरेच आनंद अनुभवयाला मिळण्याची शक्यता देखील नाकारता येत नाही.मात्र या व्हिडीओमुळे फोटोमुळे आपला फोन काहीसा हळू होतो हे देखील तितकेच खरे‌
    जी गोष्ट व्हिडीओ आणि फोटोची त्यासारखीच गोष्ट खुप दिवसात काहीच हालचाल न झालेल्या व्हाटसप ग्रूपची .एखाद्या विशिष्ट कारणासाठी तयार केलेले ग्रूप गरज संपल्यावर तसेच पडून राहतात,त्या घटनेची आठवण मागे ठेवत. या प्रकारच्या ग्रूपवर एखादा मेसेज जर कोणी टाकला की आपण त्या ग्रुपचे मेंबर बघावे काही जनांनी तो ग्रूप सोडल्याचे आपणास दिसेल जसे काही ते या क्षणाचीच वाट बघत होते.
असी सगळी गमत जमंत असते मित्रानो डिजीटल कचऱ्याची 

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

पुरुषांसाठी महिला किती आवश्यक आहे, हे स्पष्ट करणारे गाणे, 'इसलिये लडकिया, लडकोंसे...

मानवी आयुष्यातील छंदाचे महत्त्व स्पष्ट करणारा चित्रपट,' जब वी मेट'

जाने क्यू .....