वाचनाचे नवे स्वरूप
आपल्याकडे "वाचाल तर वाचाल " अशी एक म्हण प्रचलित आहे . जर वाचन केले तर प्रगती होतोयलोकांत मन मिळतो , मनुष्य बहुश्रुत होतो , अशा या म्हणीचा अर्थ . आपल्याकडे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आदी अनेक महान व्यक्तिमत्व या वाचनामुळे घडली . समर्थ रामदास स्वामी यांनी सुद्धा वाचनाचे महत्व आपल्या रचनेनेतून संगीतातले आहेच . ते म्हणतात "दिसामाजी काहीतरी ते लिहावे , प्रसांगी अखंडित वंचित जावे, शहाणे करून सोडावे सकल जण'' .
या वाचनाचे अनेक
पर्याय सध्या आपणांकडे आलेली आहेत . पारंपरिक छापील पुस्तकांबरोबरच अत्याधुनिक अश्यां इ बुक सारख्या
पुस्तकांमुळे पुस्तकांचे
विश्व अधिकच रुंदावले आहे . किंबहुना यामध्ये रोजच भर पडत
आहे . आधुनिक साधनांमुळे कमी जागेत कमी
खर्चात जास्त संख्येनं पुस्तके साठवली जात असलयाने पुस्तकांचे
हे जग रुंदावत आहे
. काही जण आधुनिक साधनांमुळे
वाचन संस्कृती धोक्यात आल्याची ओरड करतात ,.मला
हे मान्य नाही . माझ्या मते अशी ओरड
करणारे निव्वळ छापील पुस्तकांचा
विश्वात रममाण होणारे असतात . वाचनाच्या नव्या
स्वरूपाला हे वाचन मानतच
नाहीत , आणि त्यामुळेच हे
वाचन
संस्कृती
धोक्यात असण्याची यची वदंता करतात
. किंडल किंवा आता मी
तुमच्यासी ज्या माध्यमाच्या मदतीने
संवाद साधत आहे ते
ब्लॉग हे माध्यम ही
वाचनाचे आधुनिक स्वरुप आहे . आज अनेक मराठी
पुस्तके बुकगंगा आदी माध्यमातून ऑनलाईन
उपलब्ध आहेत . किंवा ज्यांचा कॉपीराईट संपला आहे त्यांची पीडीएफ
तयार करून विविध समाज
माध्यमातून त्या अनेकदा वितरित
केल्या जातात . आजमितीस माझ्याकडे अश्या जवळपास ४० पुस्तकांचा खजिना
आहे . म्हणजेच निव्वळ वाचनालये ओस पडली म्हणजे
. वाचन संस्कृती संपली असे मानणे चुकीचे
आहे . सध्या वाचन संस्कृतीने आपला
पारंपरिक ढाचा बदलून नवा
ढाचा तयार केला आहे
. असे म्हणणे अधिक सयुक्तिक आहे
.
किंबहुना जो पर्यंत मानवाला
ज्ञान लालसा आहे , तो पर्यंत वाचन
संस्कृती लयास जाणे कदापि
शक्य नाही .
त्यामुळे "वाचन संस्कृती धोक्यात आहे " या वाक्याला काहीच अर्थ नाही . सध्या एक संस्था ऑनलाईन
साहित्य संमेलन घेतच आहे ना ? त्याचीच पुढे चालती आहे .सध्याची
तरुण पिढी नव्या साधनाचा
वापर करत आहे आणि करत राहिल
, या बाबाबत शंका नसावी . आताचे
जग ऑनलाईन लायब्ररीचे आहे . नक्की पारंपरिक पुस्तकाचा
वाचनालयाचे . याबाबत जी भाषा बाजी
मारेल , तिचेच वाचन अधिक होणार
दुर्दैवाने आपली मराठी अन्य
भाषेच्या अतुलनेत काहीशी मागे आहे . ती
या बाबतीत पुढे येणे अत्यावश्यक
आहे .


टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा